गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल होऊ शकते का?
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय (Writ Petition No. 5099/2024)
✍️ लेखक : Adv. Sachin Waghmare
🔹 प्रस्तावना
महाराष्ट्रात गायरान (सरकारी/चाराऊ) जमिनीवरील अतिक्रमण हा मोठा प्रश्न आहे. अनेक नागरिक वर्षानुवर्षे अशा जमिनीवर राहत असल्यामुळे “हे अतिक्रमण नियमाकूल होईल का?” असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
🔹 गायरान जमीन म्हणजे काय?
- गावाची सामायिक जमीन
- जनावरांच्या चाराईसाठी राखीव जमीन
- ही जमीन खाजगी मालकीची नसते
कायद्यानुसार गायरान जमीन फक्त सार्वजनिक उपयोगासाठीच वापरता येते.
🔹 प्रकरणाची पार्श्वभूमी
या प्रकरणात याचिकाकर्त्याने 2006 साली गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र सरकारने अनेक वर्षे त्या अर्जावर कोणताही अंतिम निर्णय दिला नव्हता.
🔹 सरकारचा युक्तिवाद
सरकारने असे सांगितले की 2011 नंतर गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल करता येत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अशी अतिक्रमणे काढून टाकली पाहिजेत.
🔹 उच्च न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने स्पष्ट केले की आजच्या कायद्यानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल करणे शक्य नाही. मात्र 2011 पूर्वी केलेल्या अर्जावर सरकारने निर्णय द्यायलाच हवा.
🔹 न्यायालयाचा अंतिम आदेश
- Collector यांनी अर्जावर निर्णय घ्यावा
- अर्जदाराला सुनावणीची संधी द्यावी
- कारणांसह लेखी आदेश द्यावा
- ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा
🔹 निष्कर्ष
गायरान जमिनीचे अतिक्रमण आज सहज नियमाकूल होत नाही, पण जुना अर्ज सरकारने निर्णयाशिवाय प्रलंबित ठेवू शकत नाही.
Gairan Land Maharashtra, Gairan land encroachment regularisation, Jagpal Singh case Marathi, Gairan land law
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1. गायरान जमीन म्हणजे काय?
गायरान जमीन म्हणजे गावासाठी राखीव असलेली सरकारी जमीन जी चाराई व सार्वजनिक उपयोगासाठी असते.
Q2. गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल होऊ शकते का?
आजच्या कायद्यानुसार साधारणपणे नाही. मात्र 2011 पूर्वी अर्ज केलेला असल्यास त्यावर निर्णय घ्यावा लागतो.
Q3. या judgment मुळे थेट नियमाकूल होईल का?
नाही. या निर्णयामुळे फक्त अर्जावर निर्णय देणे बंधनकारक होते.
Q4. Collector अर्ज नाकारू शकतो का?
होय. पण तो नकार कारणांसह व कायद्यानुसार असला पाहिजे.
Q5. नवीन अर्ज करून गायरान जमीन मिळू शकते का?
नाही. 2011 नंतर नवीन अर्ज मान्य होत नाहीत.
💬 Legal Help on WhatsApp 📋 Fill Legal Help Form
0 टिप्पण्या